आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील व परिसरातील हजारो वारकरी संप्रदायाच्या नागरिकांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसापूर्वी पांडुरंगाला मटन चिकन चालते असे एका कार्यक्रमात म्हटले आहे, यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याने या नागरिकांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढत उप विभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे.