आज शनि अमावस्या निमित्त नंदुरबार तालुक्यातील श्री क्षेत्र शनिमांडळ येथे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित संसद रत्न माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांनी आज सकाळी 11 च्या सुमारास सहपरिवार शनि महाराजांचे दर्शन घेतले. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात चांगली पर्जन्यवृष्टी होवो शेतकरी बांधवांचे शेती उत्पन्न चांगले होवो यासह जिल्ह्याच्या प्रगतीसाठी शनी महाराजांकडे प्रार्थना केली. आरती पूजन करत ग्रामस्थांचे भेट देखील घेतली.