पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या खेडी शिवारात थोरल्या भावाने धाकटा भाऊ झोपेत असताना त्याच्या डोक्यावर काठीने वार करून त्याची हत्या केल्याची घटना खेडी शिवारात उघडकीस आली. शिशुपाल गंगाधर पिलाने वय 40 वर्ष असे मृतकाचे नाव आहे.तर मनोज गंगाधर पिलाने वय 41 वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे.आरोपीविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कुही पोलीस करीत आहेत.