ऐतवडे बुद्रुक येथे पर्युषण पर्वाची सांगता; अनंतनाथ तीर्थंकरांची पालखी मिरवणूक उत्साहात. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील श्री १००८ शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात दशलक्षण, पर्युषण पर्वाचा समारोप अनंतचतुर्दशी निमित्त झाला. या निमित्ताने अनंतनाथ तीर्थंकरांची प्रतिमा व शास्त्राची पालखी प.पू. १०८ सकलकीर्ती महाराज व १०५ क्षूल्लक अर्ककीर्ती महाराज यांच्या सानिध्यात सवाद्य मिरवणुकीतून काढण्यात आली. “अनंतनाथ भगवान की जय”, “जय जिनेन्द्र”, “व्यसने सोडा, झाडे लावा” या जयघोषात मंदिरातून मिरवणुकी