मिरज महानगरपालिकेच्या आवारातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या, गळती लागलेल्या इमारतीमध्ये असलेले मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय हे सध्या धोकादायक इमारत बनलेली आहे. सतत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने जीर्ण झालेले छत, भिंती, तलाठी कार्यालयाच्या छतावर पाणी साठून गळतीने महत्त्वाची कागदपत्रे, दस्ताऐवज, दप्तर, संगणक भिजले जात आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयामधील अधिकाऱ्यांच्या, नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका आहे. सदर तलाठी कार्यालयाच्या दुराव