मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीतील कॉलेज व शाळा परिसरात विना परवाना गाड्या चालविणे, विना कागदपत्र गाड्या चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे अशा प्रकारच्या तक्रारी जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांकडून सातत्याने प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी वाहतूक विभागाला विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी विना परवाना वाहनचालक, नंबर प्लेट नसलेली वाहने, कागदपत्रे सोबत न ठेवणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे यावर कारवाई केली.