गुजराल पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या एका अज्ञात इनोव्हा कारने वडील आणि मुलीला धडक दिल्याची घटना सोमवारी 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता समोर आली आहे. या अपघातात वडील गंभीर जखमी झाले असून, मुलीलाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी रात्री 10 वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.