साताऱ्यातील महाडा कॉलनी येथे पहाटे पाच वाजता भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे, महिलेचा अपघात होऊन ती गंभीर जखमी झाली, याची दखल घेत पालिका प्रशासनाकडून, आज सदर बाजार, महाडा कॉलनी, लक्ष्मी टेकडी, कुरेशी गल्ली या ठिकाणी भटकी कुत्री पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे, सदर बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची दहशत असून, महिला व लहान मुलांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वारंवार होत आहे, त्यामुळे येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली होती