धाराशिव जिल्हयाच्या आर्थिकपाहणी अर्थसंकल्पीय प्रकाशनाकरिता लागणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आर्थिक आकडेवारी गोळा करण्यासह शासनाच्या विविध योजनांचे मुल्यमापन करणे यासह नियोजनाच्या विविध कामात सुलभता आणणाऱ्या सांख्यिकी विभागाच्या नुतन कार्यालयाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते आज दि.5 सप्टेंबर रोजी दु.2 वा.करण्यात आले.उदघाटन प्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे,सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला,प्रीतम कुंटला व सांख्यिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते