धरणगाव शहरात भारतीय संविधानाचा आदर व गौरव करण्यासाठी मुख्य रस्त्यावर 'संविधान चौक' उभारण्याची मागणी संविधान समितीच्या सदस्यांनी मंगळवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्याकडे केली आहे. संविधान समितीच्या वतीने यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून, शहरातील सर्व समाजबांधवांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.