नशामुक्त रत्नागिरी आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी फिट इंडिया रन आणि सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली रविवारी सकाळी साडेसात वाजता पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस परेड मैदान येथून सुरू झाली. रत्नागिरी शहरातील नागरिक, युवक, तसेच सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रॅलीचे नेतृत्व जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले. त्यांनी नागरिकांना नशामुक्तीचे महत्त्व आणि शारीरिक तंदुरुस्तीचे मूल्य याचे मार्गदर्शन केले