सांगोला तालुक्यातील जवळा येथील सरकारी तलावात अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असलेल्या टेम्पोसह दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल नदाफ यांनी फिर्याद दिली असून रावसाहेब श्रीपती यमगर वय ४०, रा. घेरडी, सांगोला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये तब्बल पोलिसांनी 13 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सांगोला पोलीस स्टेशन आवारात आणून लावला आहे.