पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मित्रांसोबत गडावर फिरायला गेलेला गौतम गायकवाड या तरुणाचा पाय घसरून तो खोल दरीत कोसळला होता.तब्बल पाच दिवसांच्या शोधानंतर रविवारी संध्याकाळी तरुणाचा शोध लागला आहे.