Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे.37 वर्ष शिवसेनेत एकनिष्ठ राहिलेल्या सहसंपर्कप्रमुख व माजी महापौर त्रंबक तुपे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे नेते विनायक राऊत यांना हा राजीनामा पाठवला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत माझी कुठलीच नाराजी नाही. मात्र मला वार्डाच्या विकासाचा विचार करणे गरजेचे आहे म्हणले आहेत.