समुद्रपूर: तळोदी येथिल शेतकऱ्याच्या तिन एकरातील सोयाबीन पिकावर येलोमोझ्याक सारखा रोग येऊन पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना अचानक शेतकऱ्याच्या नजरे समोर पिवडे यामुळे शेतकरी तुळसिराम देवराव खेळकर यांनी चक्क उभ्या सोयाबीनच्या पिकात जनावरे सोडली आहे.जवळपास ६० हजार रुपये खर्च करून अशा प्रकारे पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे डोळे पाणावले आहे. तरी शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी शेतकरी तुळसिराम देवराव खेळकर यांनी केली आहे.