अहिल्यानगर जिल्ह्याला जीवनदायी असलेल्या राहुरीचे मुळा धरण हे तांत्रिकदृष्ट्या भरले असून आज सायंकाळी मुळा नदी पात्रात पाच हजार क्युसेक्सनेपाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे. 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेले धरण हे आज तांत्रिक दृष्ट्या भरले त्यामुळे 2500 क्युसेक्स वरून हा विसर्ग 5000 पर्यंत वाढवण्यात आला त्यामुळे नदीपात्र परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.