सकाळच्या सुमारास कोंढा ते बेलाटी मार्गावरूनच जात असताना एका ५४ वर्षीय इसमाची अचानक प्रकृती खराब झाली. तो रस्त्याच्या कडेला झोपला. ही घटना या मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित इसमाला प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केल्याची घटना घडली. ही घटना ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कोंढा येथे घडली. संजय पांडुरंग कझके (५४) असे घटनेतील मृतक इसमाचे नाव आहे.