बीड जिल्हा गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा मंगळवार दि 30 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सहा चोरट्यांना अटक करून पोलिसांनी तब्बल सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत सुमारे ३ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.२९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. चौकशीत आरोपींनी बीड, लातूर, सोलापूर, बार्शी आणि छत्रपती संभाजीनगर या भागांत दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवन