हिंगणघाट येथे खुन करून पडून गेल्या हत्याऱ्यांना शहर पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाने बडनेरा येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीसांकडू प्राप्त झाली आहे. सौ ज्योती मनोज बेदी वय वर्ष रानिशानपुरा वार्ड हिंगणघाट यांनी तोंडी रिपोर्ट दिली की,तीचे पती मनोज बेदी यांनी आरोपी कडुन व्याजाने पैसे घेतले होते. त्या व्याजाच्या पैशाचे कारणावरून आरोपी नेहमी घरी जावुन पैसे मागण्याचा तगादा लावत होता. व त्या कारणावरून पती यास शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. अशी तक्रार दाखल केले होती.