कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव भुसानगर येथे आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा.बंडू देठे यांच्या घराला विजेच्या शॉर्टसर्किटने भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत घरातील सर्व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले असून घटनास्थळी काळे कारखान्याच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परीश्रम घेतले. या आगेच्या घटनेत देठे कुटुंब अक्षरशा उघड्यावर आले आहे.