हाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला 22 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. त्यासाठीच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेत भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी नोव्हेंबर रोजी तीन वाजता माध्यमाला माहिती दिली आहे.