सोलापूर शहरातील वाढती अस्वच्छता, खड्डेमय रस्ते व नादुरुस्त नागरी सुविधा याविरोधात उबाठा गटाच्या शिवसेनेने सोमवारी दत्त चौक येथे अनोखे आंदोलन छेडले. शिवसैनिकांनी गणपतीचा मुखवटा परिधान करून मोर्चा काढला व दुपारी ३ वाजता झोन कार्यालयासमोर निदर्शने केली. नागरिकांना होणाऱ्या हालअपेष्टा लक्षात घेऊन महापालिकेचा निषेध करण्यात आला. शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.