मेहकर शहरातील तहसील चौक परिसरात रविवारी संध्याकाळी जुन्या किरकोळ वादातून दोन तरुणांमध्ये चाकूने भोसकाभोसकी झाल्याची घटना घडली. घटनेत छोटू गवळी हा तरुण गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी छ.संभाजीनगर येथे हलविण्यात आले.तर अस्लम गवळीला मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.माहितीनुसार, अस्लम गवळी व छोटू गवळी या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय कारणावरून वाद सुरू होते. एका उद्घाटन सोहळ्यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद रंगला.