आज दिनांक 27 ऑगस्ट ला गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर गणरायाचे सर्वत्र मोठ्या उत्साहात आगमन झाले. यावेळी ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांच्या वतीने देण्यात आलेल्या गणपती बाप्पा मोरया या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.