पुणे बंगलोर आशियाई महामार्गावर वराडे कराड गावच्या हद्दीत कंटेनर चालकाचा मद्यधुंद अवस्थेतील थरार पहायला मिळाला. दारूच्या नशेत निट उभं राहायला येत नसलेल्या अवस्थेत, कंटेनर चालक वराडे येथील डिव्हायडरला धडला. अपघातानंतर कंटेनर डिव्हायडर व रस्त्यावर अडकून पडल्याने, सुमारे दीड तास दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तळबीड पोलीस व महामार्ग पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली.सुमारे दोन तास क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरू होते.