भुजबळांच्या शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री भेट घेतील : मंत्री उदय सामंत हैदराबाद गॅझेटीयर जाहीर करताना ओबीसींचे आरक्षण कमी होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेऊन शासन निर्णय काढण्यात आला असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून वेळ पडल्यास दोन्ही समित्यांचे अध्यक्ष एकत्रित चर्चा करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.