लग्नाच्या आमिष दाखवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एका तरुणावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार तरुणाने पिडितेला २७ ऑगस्ट रोजी दुसऱ्या मुलीशी साखरपुडा करून फसवल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.