नवेझरीजवळील कुलपा शेत शिवारात बीट लोणारा क्रमांक 373 गट नंबर 340 येथे वाघाने गाईची शिकार केल्याची घटना दिनांक 3 सप्टेंबरला उघडकीस आली आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार शेतकरी दिलीप दौलत मळकाम हा आपले गाई ढोरे चारत असताना दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वाघाने अचानक गाईवर हल्ला करून गाईला ओढत वनपरिक्षेत्रात नेले. यात गाईच्या मृत्यू झाला असून गाईची किंमत जवळपास पस्तीस ते चाळीस हजार आहे.