निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी तुरीची पेरणी बेडवर करावी असे आव्हान उपकृषी अधिकारी विठ्ठल धांडे यांनी केले आहे. शेलगाव देशमुख येथील शेतकरी विष्णू आखरे यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालक शेख अल्ताफ यांच्या माध्यमातून बेड पाडणे चालू असताना 6 जून रोजी दुपारी 4 वाजता उपकृषी अधिकारी विठ्ठल धांडे यांनी भेट दिली व शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन वाढण्यासाठी बेडवर पेरणी करावी असे आवाहन केले.