एखाद्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली तर रोहित पवार यांच्या पोटात का दुखत असेल असा सवाल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी उपस्थित केला. यादरम्यान मागच्या काळात काय झालं हे एकदा रोहित पवार यांनी चष्मा लावून पहावे असा टोलाही त्यांनी हाणला.