नागपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून यामध्ये जिल्ह्यातील डॅम व छोटे मोठे जलाशय पाण्याने लबालब भरलेले आहे. त्यातच उमरेड तालुक्यातील मकर ढोकडा डॅम 100% भरला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. डॅम भरल्यामुळे या डॅमला वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी प्रशासनातर्फे निसर्गप्रेमी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.