‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ ही म्हण मतचोरीच्या अनुषंगाने सिद्ध होत असल्याचे वारंवार पुरावे मिळात आहे. निवडणूक आयोगाच स्वत : उलटे कांगावे करत आहे. आता लोकशाही वाचवण्यासाठी व आपला संविधान अधिकार जागृत करण्यासाठी मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी मॅरेथॉन बुलढाण्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. चिखलीत नगरपालिका, पोलीस प्रशासनाची परवानगी असतांनाही सत्ताधारी पक्षाने विचित्र स्वरुपाचे बॅनर लावून वाद निर्माण केला.