मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज, सोमवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सुरुवातीपासूनच आपण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत उभे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी उभे