भुसावळ तालक्यातील वरणगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बोहर्डी खुर्द शिवारात मोठी कारवाई करत गावठी हातभट्टीवर छापा टाकला. झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या दारू भट्टीचा पर्दाफाश करत पोलिसांनी एकूण ₹४३ हजार २५० रुपये किमतीचा अवैध दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले आहे. या प्रकरणी रविंद्र ज्ञानदेव गोपाळ (वय ४०, रा. बोहर्डी बु., ता. भुसावळ) यास अटक करण्यात आली असल्याची माहिती दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी वरणगाव पोलीस स्टेशन तर्फे देण्यात आली आहे.