दिघी परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करणाऱ्या एका तरुणाला चोर समजून लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली. त्याला पत्र्याच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले होते.सलग चार दिवस उपचार सुरू असताना अखेर शुक्रवारी (29 ऑगस्ट) त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी खुन आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक केली आहे.