आज शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही सर्वांनी पाहिलेच असेल की, आमच्या कार्यक्षेत्रात मटका जुगार सर्रास सुरू होता. येथे एक मोठा मटका बादशाह कार्यरत होता, पण मी आणि माझ्या टीमने छापा टाकला. नऊ महिन्यांपूर्वी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून, मी आमच्या पोलिस विभागाला वारंवार सूचना दिल्या आहेत की आमच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा खराब होईल असे कोणीही कृत्य करू देऊ नये. असे देखील राणे यांनी म्हणाले.