प्रत्येक सणावारांचे दिवस असतात मात्र आता काही पतंगप्रेमी हे वर्षभर आली लहर आणि केला कहर या उक्तीप्रमाणे त्या सणावारात घेतल्या जाणाऱ्या वस्तूंचा सर्रास वापर करताना दिसून येत आहे.त्याचे झाले असे की संक्रांती सणाच्या कालावधीत पतंग उडवणे ही आपली परंपरा मात्र रहात्यात एका पतंगप्रेमीने बहुदा सरकारने बंदी केलेला चायना मांज्या दोरा आणि पतंग उडवला आणि हाच दोरा एका तरुणाच्या गळ्याला लागून त्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे.