मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर तरुणांनी दुचाकीवर हुल्लडबाजी केली. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. गोरेगाव ते वांद्रे खेरवाडीच्या दरम्यान आज सकाळी ही स्टंटबाजी सुरू होती. या तरुणांनी स्वतःसोबतच इतरांचा जीवही धोक्यात घातला. त्यांच्या स्टंटबाजीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.