काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांच्या कार्यालयाच्या फलकावर काळी शाही फेकल्याचा वाद चांगलाच पेटला आहे. यामध्ये दोन आमदारांमध्ये घमसान शब्द युद्ध सुरू आहे. दरम्यान आज आमदार क्रिष्णा खोपडे यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेत कार्यवाहीची मागणी देखील केली आहे. तसेच संबंधित पोलीस उपायुक्त यांना निलंबित करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे.