जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांनी मोठ्या संख्येने अर्ज सादर केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी विजय कुमार ढगे होते. या दिनात एकूण ७३ अर्ज प्राप्त झाले.