बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे 11 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता संभाजी ब्रिगेड कार्यकारिणी विस्तार व पत्रकार बांधवांचा भव्य सन्मान सोहळा प्रचंड उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष रविंद्र चेके तर प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेड राज्य संघटक योगेश पाटील,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील, मराठा सेवा संघाचे परमानंद गारोळे, राजेंद्र पवार, दिनकर शिंदे, महादेव ससाने उपस्थित होते.