राज्यात संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना सरकारने तातडीने मदत करावी. अशी मागणी आज मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली. पूरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, ही नियम आणि निकष लावायची वेळ नसून माणुसकी दाखवायची वेळ आहे. मला कळत नाही की सरकार एवढं हात राखून का वागत आहे.