पुसद शहरातील बंजारा कॉलनीतील 23 वर्षीय तरुण नामे देवा अनंता महाजन हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा मिससिंग रिपोर्ट दाखल करण्यात आली होती. आज दिनांक 12 सप्टेंकबर रोजी पोफाळी पोलीस स्टेशन हद्दीत मारवाडी शेतशिवरात एका विहिरीत देवा महाजन याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.