दरोगा प्लॉट परिसरात अज्ञात चोरट्याने घराबाहेर उभी केलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी राहुल कैलाश हिवराले (वय ३०, व्यवसाय मजुरी, रा. दरोगा प्लॉट, अमरावती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आपली काळा-लाल रंगाची शाईन दुचाकी (क्र. MH27DG9618) दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता सर्व्हिसिंग करून घरी आणली होती. ती घराबाहेर लॉक करून ठेवून ते जेवण करून झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ७ वाजता उठून पाहिले अ