अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रलंबीत मागण्या सोडविण्याबाबत अनेक निवेदने देवून सुध्दा मागण्या सोडविण्यासाठी शासन कोणतेही गांभिर्य घेत नसून अंगणवाडी कर्मचार्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करीत आज दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी विविध मागण्यासंदर्भात अंगणवाडी कर्मचार्यांनी जि.प. वर मोर्चा काढून निवेदन दिले. सदर मोर्चाचे आयोजन अध्यक्षा सविता इंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. सदर मोर्चामध्ये संपूर्ण वाशिम जिल्ह्यामधून शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.