शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन-अडीच महिने झाले तरी गोंदिया जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर ६१ जागा रिक्त राहिल्या आहेत. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकाराच्या अधिनियमानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश मोफत देण्यात येतात. गोंदिया जिल्ह्यात आरटीई निकषपात्र १२८ शाळांमध्ये १०११ विद्यार्थी संख्या आहे.