मलकापूर शहरातील श्रीराम कॉलनी परिसरात ३१ ऑगस्ट रोजी रात्री तरुणीच्या गळ्यातील सोन्याची पोत किंमत १ लाख २६ हजार रुपये अज्ञात चोरांनी हिसकावून पलायन केल्याची घटना घडली. याप्रकरणी निकिता कार्तिक गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.