क्रेडाई जालना यांच्या पुढाकारातून जालना फर्स्ट अभियानांतर्गत सामाजिक संस्थांची एक अतिशय महत्वपूर्ण बैठक शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पार पडली. या बैठकीत सहभागी झालेल्या विविध संस्थांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि वास्तवाशी निगडित मुद्द्यांवर प्रकाश टाकला. कुठलाही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. काही समस्या तत्काळ सुटू शकतात, काहींना थोडा वेळ लागतो, तर काहींना अधिक कालावधीची गरज भासते. याच अनुषंगाने नियोजनात्मक चर्चा केली.