आगामी लोकसभा,विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील बीएलओ व सुपरवायझर यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन शहरातील करवंद नाक्यावरील एस.एम. पटेल हॉलमध्ये करण्यात आले. या प्रशिक्षण सत्राचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले. त्यांनी प्रशिक्षणाचा उद्देश, त्याचे महत्त्व व निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशिक्षण किती उपयुक्त ठरेल, याविषयी सविस्तर माहिती दिली.