जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या एका संशयिताला हॉटेल सरूची ईन येथे शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता रंगेहात पकडले आहे.